सरकारकडून ऑटो क्षेत्रासाठी नवीन योजना

nitin-gadkari
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्र सरकार ऑटो क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी काही नवीन योजनांची घोषणा करणार असून ही माहिती देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, ऑटो इंडस्ट्रीने इलेक्ट्रिक आणि हायब्रीड गाडय़ा तयार करण्यासाठी प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे. त्यांच्यासाठी व्हेईकल स्क्रॅपिंग धोरण फेबुवारीच्या शेवटपर्यंत कॅबिनेटमध्ये मांडण्यात येईल.

२०२० पासून सरकार बीएस६ मानक लागू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये उद्योगांना आवश्यक ती मदत पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. हे भविष्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. देशामध्ये प्रदूषण ही एक मोठी समस्या असून, त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे वाहन उद्योगाने इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी प्रयत्न करावा, असे त्यांनी म्हटले.

केंद सरकार ऑटो क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी काही नवीन योजनांची घोषणा करण्याची शक्यता आहे. ऑटो क्षेत्रात नवीन क्रांती, संशोधन आणि योग्य धोरण राबविण्याची गरज आहे. सरकार त्यासाठी या क्षेत्राला योग्य ती मदत करण्यासाठी तयार आहे. वॉटरवेज पोर्टसाठी 20 मीटरपर्यंत ड्राफ्ट तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे खर्च कमी येईल. १११ नद्यांमधून वाहतूक करण्याबाबत जलद गतीने काम सुरू असून त्याला उद्योगांना मोठा फायदा होणार आहे.

Leave a Comment