ऑटो एक्स्पोमध्ये दाखल झाली विजेवर धावणारी बस

ecolife
नवी दिल्ली : ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्या दिवशी ५० पेक्षा जास्त कार दाखल झाल्यानंतर दुस-या दिवशीही मोठय़ा प्रमाणात कार आणि विविध मॉडेल दाखल करण्यात आले आहेत. सर्वात आधी स्कॅनियाने आपली एक पॅसेंजर बस आणि ट्रक याला दाखल केल्यानंतर जेबीएमने आपली प्रसिद्ध विजेवर धावणारी बस सादर केली. या इलेक्ट्रिक बसला ‘ईको लाईफ’ हे नाव देण्यात आले आहे.

ही बस एकदा चार्ज केल्यानंतर २०० किमीपर्यंत चालवली जाऊ शकते. या बसमध्ये प्रवाशांसाठी २९ आसने ठेवण्यात आली आहेत. दिल्लीमध्ये प्रदूषणाची मोठी समस्या असल्यामुळे ही बस दिल्लीमध्ये प्रदूषण कमी करण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा हातभार लाऊ शकते. ह्या बसमुळे शहरी वाहतुकीमध्ये मोठी क्रांती घडवून आणेल, अशी आशा कंपनीचे कार्यकारी संचालक निशांत आर्या यांनी म्हटले आहे.

Leave a Comment