ट्विटरने भारतीय युजर्ससाठी बदलले आपले होमपेज

twitter
मुंबई – भारतीय युजर्ससाठी ट्विटरने आपल्या होमपेजचे डिझाईन बदलले आहे. पण हे बदलले डिझाईन आपल्या फक्त लॉगइन करण्यापूर्वीच आपल्याला दिसेल.

दरम्यान मागील वर्षीच ट्विटरने असा प्रयोग अमेरिकेत देखील केला. त्याला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे आता ट्विटरने जगातील २३ देशात ही सुविधा सुरु केली असून त्यात भारताचा देखील समावेश आहे. यापूर्वी भारतात ट्विटरच्या होमपेजवर भारतीयांचे फोटो दाखविण्यात येत होते. पण आता त्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागातील टॉप ट्वीट दाखवण्यात येतील. ट्विटरच्या नव्या लुकमध्ये सर्वातवर एक मोठा सर्च बार दिला असून ज्यात तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिक हॅशटॅगसोबत पाहायला मिळतील.

Leave a Comment