आसुस आणत आहे तब्बल २५६ जीबी इंटरनल मेमरीचा स्मार्टफोन!

assus
मुंबई: लवकरच झेनफोन २चे नवे व्हर्जन मोबाइल उत्पादक कंपनी आसुस बाजारात लाँच करणार आहे. झेनफोन २ डिलेक्स स्पेशल एडिशनमध्ये अपग्रेडशन करण्यात आले आहे.

२.५GHz इनटेल Z३५९०चा प्रोसेसर या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. तर तब्बल २५६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून एसडी कार्डच्या मदतीने मेमरी वाढविता येणार आहे. आधीच्या स्मार्टफोनप्रमाणेच या अपग्रेडेड व्हर्जन स्मार्टफोनचे बरेचसे फीचर आहेत. यात ५.५ फूल एचडी डिस्प्ले असून १०८०×१९२० पिक्सल रेझ्युलेशन आहे. तर यामध्ये १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

याच्या बॅटरीची क्षमता ३०००mAh आहे. तर यामध्ये अँड्रॉईड ५.१ लॉलिपॉप सपोर्ट आहे. या नव्या हॅण्डसेटमध्ये ४जी एलटीई सपोर्ट आहे. तर ड्यूल सिम कार्ड सपोर्ट आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि लाँचिंगच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Comment