आता आणखी मोठा होणार व्हॉट्सअॅप ग्रुप

whatsapp
मुंबई – व्हॉट्सअॅप या मोबाइल मेसेजिंग अॅपमुळे अनेक ग्रुप तयार झाले असून यात मित्र-मैत्रिणींना आपल्या ग्रुपमध्ये अॅड करण्याची इच्छा असूनही त्यांना ग्रुपमध्ये अॅड करणे अनेकदा ग्रुप मेंबर लिमिटमुळे तसे करता येत नव्हते. पण आता यापुढे तसे होणार नाही. कारण, व्हॉट्सअॅपने ग्रुप मेंबरच्या संख्येत वाढ केली आहे.

एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सुरुवातीला ५० जणांपर्यंत मर्यादा होती. त्यानंतर ही सदस्यसंख्या १०० पर्यंत करण्यात आली होती. आता त्याच्याही पुढे जात व्हॉट्सअॅपने ही ग्रुप मेंबरची संख्या तब्बल २५६ केली आहे. तर ब्रॉण्डकास्ट मेसेजसाठीही सुरुवातीपासूनच २५६ जणांची मर्यादा होती. भारतात व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक लोकप्रिय अॅप असून त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे ग्रुप मेंबरची ५० किंवा १०० ही संख्याही कमी पडत असल्यामुळेच आता ग्रुप मेंबरची मर्यादा २५६ पर्यंत करण्यात आली आहे.

१ अब्ज यूर्जसचा टप्पा नुकताच व्हॉट्सअॅपने गाठला आहे. व्हॉट्सअॅपचा मालक मार्क झुकरबर्गनेच याबाबत माहिती दिली होती. फेब्रुवारी २०१४मध्ये फेसबुकने १९ अब्ज डॉलरमध्ये व्हॉट्सअॅप विकत घेतले होते. फेसबुककडून हा आजवरचा सर्वात मोठा व्यवहार होता. फेसबुकवर एका पोस्टमध्ये व्हॉट्सअॅपचा सह-संस्थापक जॉन कोउमने सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर दररोज ४२ अब्ज मेसेज, १.६ अब्ज फोटो आणि २५ कोटी व्हिडिओ शेअर केले जातात.

Leave a Comment