झिका विषाणुबद्धल झुकरबर्गने उघडली मोहिम

mark
मुंबई : अवघे जग झिका विषाणूमुळे हादरून गेल्यामुळे या विषाणूबद्धल जगभरातून जनजागृती केली जात असून, फेसबुकचा सर्वेसर्व्हा मार्क झुकेरबर्ग यानेही आपल्या फेसबुक अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ झिका व्हायरसबद्धल माहिती देतो. तसेच, गरोदर महिलांनी याबाबत काय काळजी घ्यावी याबाबतही मार्गदर्शन करतो.

झिका हा एक विषाणू (व्हायरस ) असून, तो रोग नसल्याचे काही अभ्यासकांचे म्हणने आहे. हा विषाणू अमेरिकेतू जगभर पसरला आहे. अमेरिकेतील टेक्सास प्रांतात झिका व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आला. व्यक्तिला झिका व्हायरसची लागण डास चावल्यामुळे नव्हे तर, लैंगिक संबंधातून होत असल्याचे, अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.

Leave a Comment