२५ हजार कोटींची बँकांमध्ये करणार सरकार गुंतवणूक

investment
नवी दिल्ली – बँकेमध्ये गुंतवणूक करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून, कोणत्याही स्थितीत या घोषणेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार मार्च अखेरपर्यंत या बँकेमध्ये घोषणेनुसार २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

सरकारने जुलै २०१५ मध्ये केलेल्या घोषणेनुसार, सरकार बँकेमध्ये ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक चार वर्षाच्या काळात करणार आहे. पहिल्या दोन आर्थिक वर्ष (२०१५-१६ आणि २०१६-१७) मध्ये २५ हजार कोटी रुपये आणि पुढील दोन आर्थिक वर्ष (२०१७-१८ आणि २०१८-१९) मध्ये १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. घोषणेनंतर सरकारने ऑगस्टमध्ये १३ सरकारी बँकांमध्ये २०.८८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या बँकांची नऊ महिन्यातील कामगिरी पाहून पुढील ५ हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.

Leave a Comment