फेसबुककडून १२व्या वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट

facebook
कॅलिफोर्निया: आज १२ वर्षांचे झाले आहे आपल्या सर्वांचे लाडके फेसबुक. मार्क झुकेरबर्ग या तरूणाने अवघ्या १९व्या वर्षी ४ फेब्रुवारी २००४रोजी आपल्या चार मित्रांसोबत फेसबुकची सुरूवात केली आणि काही काळातच फेसबुकने गगनभरारी घेतली.

जगभरात आज १.५ अरब लोक फेसबुक वापरतात. त्यामुळे आजचा दिवस हा फ्रेंड्स डे म्हणून साजरा करावा असे आवाहन फेसबुकचे निर्माते मार्क झुकेरबर्ग यांनी केले आहे. फेसबुक माहित नाही, असा माणूस आज शोधून सापडणार नाही. आज जगात सगळीकडे लोकप्रिय असणार्‍या संकेतस्थळात फेसबुक सर्वात वरच्या स्थानावर आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मार्क झुकरबर्गने ४ फ्रेबुवारी हा दिवस फ्रेंड्स डे म्हणून साजरा करावा असे आवाहन केले होते.

१२ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत फेसबुकने आपल्या यूजर्ससाठी एक खास भेट आणली आहे. Happy Friends Day! या नावाने तुम्हाला तुमच्या आजवरच्या खास फोटोंचा एक व्हिडिओ दिसेल. या व्हिडिओमध्ये तुमचे आणि तुमच्या मित्रांचे खास क्षण तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. फेसबुकवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच याबाबत नोटिफिकेशन दिसून येईल. त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करु शकता. अथवा एडिट करुन त्यात काही बदलही करु शकता.

आपल्या यूजर्सना कायमच काही तरी नवीन देण्याचा फेसबुक प्रयत्न करीत असते. आज फेसबुकच्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात आलेल्या Happy Friends Day!च्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. आपले खास क्षण जे कॅमेऱ्यात कैद झाले होते ते या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.

Leave a Comment