पुण्यात ‘ओला’ची ‘ओला शेअर’ सुविधा

ola
पुणे – ‘ओला शेअर’ या भारतातील पहिल्या सोशल राइड-शेअरिंगची सेवा भारतातील आघाडीच्या मोबाईल ऍप ‘ओला’कडून पुण्यात सुरु करण्यात आली आहे. एकाच मार्गावर प्रवास करणा-या एकाच सोशल ग्रुपमधील वेगवेगळय़ा व्यक्तींना ओला शेअरच्या साहय़ाने त्यांचा कॅबप्रवास शेअर करण्याची मुभा यामुळे मिळणार आहे.

ही सेवा बेंगळूर, दिल्ली, एनसीआर, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई येथे आधीच सुरू झाली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून ग्राहकांना टॅक युवर राइड, शेअर राइड डिटेल्स, एसओएम, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्स, २४ तास कस्टमर सपोर्ट आणि इन-ट्रिप फीडबॅक या ओलाच्या सुरक्षाविषयक सुविधा उपलब्ध आहेत. यातून नागरिक शहरातील प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीही हातभार लावू शकतील, असे शेअर्ड मोबिलिटी विभागाचे प्रमुख ईशान गुप्ता यांनी सांगितले. याद्वारे कॅबप्रवासाची सोय कमी दरांत तसेच अधिकाधिक ग्राहकांना प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून देत असून, एक अब्ज लोकांसाठी प्रवास व्यवस्था निर्माण करण्याच्या ध्येयाकडे वाटचाल सुरू असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

Leave a Comment