विमानभाड्यापेक्षाही बैलगाडी भाडे महाग

bibrod
बैलगाडीतून प्रवास करण्यासाठी साधारण किती खर्च अपेक्षित असतो? त्यातूनही केवळ सहा आठ किलोमीटर अंतरासाठी किती भाडे द्यावे असा प्रश्न विचारला तर कुणाचेही उत्तर ५० ते १०० रूपये असेच असेल. मात्र मध्यप्रदेशातील बिबरोड गावात बैलगाडीतून पौष अमावस्येच्या दिवशी जायचे असेल तर हेच भाडे ५ ते ७ हजार रूपये आहे असे सांगितले तर कदाचित कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. केवळ ६ किमीच्या अंतरासाठी आकारले जाणारे हे भाडे दिल्ली इंदोर विमानतिकीटापेक्षाही अधिक आहे.

मात्र येथे प्रश्न अंतराचा नाही तर श्रद्धेचा आहे. या गावात जैनांचे एक मंदिर आहे.स्वामी ऋषभदेवांच्या या मंदिरात पौष अमावस्येला दर्शनासाठी प्रचंड संख्येने जैन भाविक येतात. या मंदिरात दर्शनासाठी जाताना बैलगाडीतून गेले तर कुटुंबात सुखशांती, समाधान व समृद्धी येते अशी भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी येथे या दिवशी हजारो भाविक येतात मात्र येण्याअगोदरच बैलगाडीचे बुकींगही करतात. दोन तीन माणसेच असतील तर छोटी बैलगाडी पुरते मात्र त्यासाठीही २ हजारापेक्षा अधिक भाडे द्यावे लागते. मोठी गाडी असेल तर हेच भाडे ५ ते ८ हजार रूपयांदरम्यान असते असे समजते.

Leave a Comment