आता समुद्रात मायक्रोसॉफ्टचे डाटा सेंटर

microsfot
न्यूयॉर्क – थंड हवामान असणा-या देशांमध्ये गुगल आणि फेसबुकसारख्या जगातील मोठय़ा कंपन्या डाटा सेंटर उभारतात, जेणेकरून सर्व सर्व्हर्स थंड राहावेत. आपले सर्व्हर्स थंड राखण्यासाठी डाटा सेंटर समुद्राच्या आत ठेवण्याची तयारी जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टने सुरू केली आहे. कंपनीने यासाठी एक प्रोटोटाइप तयार करत याची चाचणी देखील घेतली आहे.

मायक्रोसॉफ्टच्या नॅटिक प्रकल्पांतर्गत डाटा सेंटर्स समुद्राच्या आत ठेवला जाईल. यामुळे कंपनीचे पैसे वाचतील, त्याचबरोबर पर्यावरणाला देखील अधिक नुकसान होणार नाही. डाटा सेंटर्समध्ये ठेवलेल्या लाखो सर्व्हर्संना थंड ठेवण्यासाठी एअर कंडिशनिंगवर मोठा खर्च करावा लागतो. याशिवाय अशा जागेवर डाटा सेंटर्स बनवावे लागतात, जेथे तापमान शून्य डिग्रीपेक्षाही कमी असेल.

पाण्याच्या आत डाटा सेंटर्स ठेवण्याचा अर्थ सर्व्हर्सना थंड ठेवण्यासाठी अधिक खर्च करण्याची गरज भासणार नाही. डाटा सेंटर्ससाठी कॅप्सूल फक्त ९० दिवसांमध्ये तयार होतील तर जमिनीवर एक डाटा सेंटर बनविण्यासाठी २ वर्षे लागतात असे मायक्रोसॉफ्टचे मानणे आहे. एक दिवस समुद्राच्या आत ठेवलेले डाटा सेंटर्स अंडरवॉटर टर्बाइन किंवा टायडर पॉवरच्या मदतीने स्वतः वीज बनवू शकतात असे या प्रकल्पात सामील अभियत्यांचे मत आहे.

या कल्पनेवर २०१३ पासूनच कंपनीने काम सुरू केले होते. २०१४ मध्ये याची फिजिकल प्रोटोटाइप बनविण्यात आले आणि मागील वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने पहिले सबमरीन सर्व्हर तयार केले. सर्व्हरला ८ फूट डायमीटरच्या स्टील कॅप्सूलमध्ये ठेवत कॅलिफोर्निया किनाऱयावर बसविण्यात आले. ते १०५ दिवस कार्यान्वित होते, कंपनीनुसार हा प्रयोग यशस्वी राहिला. पहिल्यांदा जेव्हा पाण्याच्या आत सर्व्हर ठेवण्याबद्दल ऐकले तेव्हा याची कोणतीही गरज नसल्याचे आपल्याला वाटले, परंतु याविषयी अधिक विचार केला असता याच्या उपयुक्ततेविषयी कळले असे या प्रकल्पावर काम करणाऱया मायक्रोसॉफ्टचे अधिकारी बेन कट्लर यांनी सांगितले.

Leave a Comment