जपानचा भारतीयांसाठी १० वर्षांचा व्हिसा

visa
जपानने भारतीयांसाठी मल्टीपल एंट्री व्हीसा वैधतेची मुदत पाच वर्षांवरून १० वर्षांवर नेली आहे. हा नवा नियम १५ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. या नियमाचा लाभ भारतीयांप्रमाणेच व्हिएतनामी नागरिकांनाही मिळणार आहे.

गतवर्षी डिसेंबरमध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारत भेटीवर आले होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानी नागरिकांसाठी भारतात व्हीसा ऑन अरायव्हलची घोषणा केली होती. त्याची सुरवात १ मार्चपासून होणार आहे. मंगळवारी जपानी परराष्ट्र मंत्री फुमिओ किशीदा यांनी भारतीयांसाठी मल्टीपल एंट्री व्हीसा वैधता १० वर्षांवर नेण्यात आल्याची घोषणा केली. यामुळे पर्यटक वाढतील, व्यवसाय वाढेल अशी अपेक्षा आहे. अर्थात व्हिसा धारकांना प्रथम प्रवास करताना व्यवसाय, शिक्षण अथवा कला यासाठीच करावा लागणार असून नंतर पर्यटनासाठी प्रवास करता येणार आहे.

Leave a Comment