१९ व्या अपत्याच्या स्वागतासाठी हे कुटुंब सज्ज

briton
भारतात कुटुंब लहान सुख महान अशी संकल्पना रूजविली जात असली तरी कांही पाश्वात्य देशांत कुटुंब मोठे करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.ब्रिटन हा त्यातलाच एक देश. येथील सर्वात मोठे कुटुंब अशी नोंद झालेल्या सू व नोएल रेडफोर्ड परिवारात जुलै महिन्यात नवीन पाहुण्याचे आगमन होणार असून हा पाहुणा या जोडप्याचे १९ वे अपत्य आहे. एकंदरीत २० जणांचा हा परिवार आता २१ जणांचा होणार आहे.

सू व नोएल त्यांच्या अठरा मुलांसह नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. या कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा २६ वर्षांचा आहे तर शेंडेफळ अजून १ वर्षाचेही झालेले नाही. रेडफोर्ड परिवाराचा बेकरीचा व्यवसाय आहे आणि कुठेही बाहेर जायचे झाले तर त्यांना मिनीबसमधून जावे लागते. या कुटुंबाचा आठवडयाचा खर्च ३ हजार पौंड आहे. मात्र सरकार मुलांसाठी देत असलेला फंड हे कुटुंब घेत नाही. आमच्या मुलांसाठी आवश्यक तितके आम्ही कमावतो आहोत आणि त्यांच्यासाठी आम्हाला अन्य कुठलीही मदत नको असे सू सांगते. सू १४ वर्षाची असतानाच तिला पहिला मुलगा झाला होता. आई होणे नेहमीच आनंददायी आहे असे ती म्हणते.

विशेष म्हणजे सू व नोएल आजी आजोबाही झाले आहेत. त्यांची दुसरी मुलगी सोफी ही २१ वर्षांची असून तिला डेझी नावाची मुलगी आहे.

Leave a Comment