शरीराच्या हालचालीवर चार्ज होणारे घड्याळ

seiko
जपानी कंपनी सिकोने त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त शरीराच्या हालचालींवर चार्ज होणारे घड्याळ सिको कॅलीबर सेव्हन डी ४८ सादर केले असून या घड्याळाची किंमत आहे ५४५०० रूपये. हे घड्याळ अमॅझॉन इंडिया वर ग्राहकांना मिळू शकणार आहे.

हे घड्याळ कायनेटिक तंत्रज्ञानावर असून त्याची बॅटरी युजरच्या चालण्यातून फिरण्यातून चार्ज होऊ शकते.म्हणजे युजर जितके चालेल तितकावेळ बॅटरी चालणार. समजा २४ तास हे घडयाळ वापरले गेले नाही तर ऑटो पॉवर सेव्ह मोडवर ते आपोआप जाईल व घड्याळ हातात बांधले की पुन्हा सुरू होईल. या घड्याळाचा रोटर १ लाख आरपीएम या वेगाने फिरतो. हा वेग एफवन कार इंजिनच्या पाचपट अधिक आहे. या घड्याळ्याला परपेक्च्युअल कायनेटिक पॉवर सेव्ह फिचर दिले गेले आहे. त्यामुळे हे घड्याळ चार वर्षांपर्यंत वेळेचा हिशोब सांभाळते तसेच त्यात २१०० सालापर्यंतच कॅलेंडरही दिले गेले आहे. यात एकदा वेळ सेट केली की ८४ वर्षे पुन्हा वेळ सेट करावी लागणार नाही.

घड्याळ लूकमध्ये अतिशय स्टायलिश आहे. रोझ गोल्ड कलरची स्टेनलेस स्टील बॉडी, गडद निळी डायल, ८ व ९ आकड्यांदरम्यान लिप इयर विंडो तसेच सफायर क्रिस्टलची ग्लास त्याला दिली गेली आहे. हे घडयाळ वॉटरप्रूफ आहे.

Leave a Comment