काचेच्या बुटात बांधा लग्नगाठ

shoe
भारतात अनेक प्रांतात लग्नात नवरदेवाचे जोडे पळवून नेण्याची प्रथा आहे. तैवानमध्ये मात्र बूट आणि लग्न यांचा वेगळाच संगम साधला गेला आहे. येथे सिंड्रेलाच्या काचेच्या बूटाची आठवण करून देईल असा ५५ फूट उंचीचा महाकाय काचेचा बूट बांधला गेला असून तो विवाहसमारंभांसाठी हॉल म्हणून वापरता येणार आहे. लग्नासाठीचे कार्यालय त्याचबरोबर पर्यटकांनाही आवडेल अशा प्रकारचे त्याचे डिझाईन केले गेले आहे.

दक्षिण पश्चिम भागातील चिआई कौंटीत कांही काळापूर्वी पाण्यात असलेल्या विषारी अर्सेनिकच्या परिणामाने येथील अनेक महिलांना गँगरीन, ब्लॅकफूटची व्याधी जडली व त्यात अनेकींचे पाय कापून काढावे लागले होते. समाजात असमानतेचा व अन्य अडचणींचा सामना करावा लागलेल्या महिलांनी त्यावर उंच टाचेचे बूट वापरण्याचा पर्याय निवडला होता.

चिआई कौंटीची प्रमुख हेलेन चांग सांगते आम्ही जो काचेचा प्रचंड मोठा बूट उभारला आहे त्याचा उद्देश महिलांना जो कठीण काळ घालवावा लागला त्याच्या आठवणीसाठी नाही तर महिलांच्या उमेदीचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहिले जावे अशी अपेक्षा आहे. हा ५५ फूट उंचीचा बूट पारदर्शक काचेपासून बनवला गेला असून येथे पर्यटकांची गर्दीही अपेक्षित आहे. हा खास हॉल उद्घाटनाअगोदरच खूप चर्चेत आला आहे.

Leave a Comment