ऑटो एक्स्पोत लॉन्च झाली होंडाची ‘नवी’

honda1
नवी दिल्ली- देश- विदेशातील अनेक कंपन्यांनी ऑटो एस्क्पो २०१६मध्ये आपापल्या सुपरबाइक व कॉन्सेप्‍ट बाइक लॉन्‍च केल्या आहेत. आपल्या सुपरबाइक्सचे चार मॉडेल डीएसकेने लॉन्च केल्या आहेत. तर होंडा कंपनीने पहिले क्रॉसओव्हर मॉडेल ‘नवी’ लॉन्‍च केले आहे. होंडाने ग्राहकांना बाइकचा कलर व डिझाइन निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

होंडा मोटरसायकल अॅण्ड स्‍कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने ‘ऑटो एक्‍सपो २०१६’मध्ये टू-व्‍हीलर सेग्मेंटमध्ये पहिले क्रॉसओव्हर मॉडेल ‘नवी’ लॉन्‍च केले आहे. कंपनीने या मॉडेलची दिल्‍ली शोरूम किंमत ३९,५०० रुपये ठेवली आहे. ही एक कस्‍टमाइज्‍ड टू-व्‍हीलर आहे. याचा अर्थ असा, की ग्राहकांना आपल्या आवडीनुसार कलर व डिझाइनमध्ये डेव्हलप करण्याची सुविधा होंडाने उपलब्ध करून दिली आहे. या बाईकची एप्रिल २०१६ मध्ये विक्री सुरु होणार आहे.
honda
होंडा नवीचे वैशिष्ट्‍ये – इंजिन: एअरकूल्‍ड, ४ स्‍ट्रोक, एसआय इंजिन, सिलिंडर कॅपेसिटी: १०९:१९cc, पॉवर: ८ BA, टार्क: ८.९६ NM, ट्रान्समिशन: ऑटोमॅटिक- व्ही मॅटिक, स्‍टार्टिंग मेथड: सेल्‍फ अॅण्ड किक, व्‍हीलबेस: १२८६MM, सस्पेन्शन: फ्रंट- टेलिस्कोपिक, रीयर- स्प्रिंग लोडेड हायड्रोलिक टाइप, टायर्स: ट्यूबलेस, बॅटरी: १२V, ३AH-MF.

Leave a Comment