इन्फोसिस उभारणार जगातील सर्वात उंच क्लॉक टॉवर

clock
भारतातील अग्रणी आयटी कंपनी इन्फोसिस त्यांच्या मैसूर येथील कॅम्पसवर जगातील सर्वात उंच घड्याळाचा मनोरा उभारणार आहे. कंपनीच्या ३४५ एकर वरील ग्लोबल एज्युकेशन सेंटर मध्ये हा १३५ मीटर उंचीचा क्लॉक टॉवर बांधला जाणार आहे. लंडनमधील बिगबेन (९६ मीटर), हूवर टॉवर ८७ मीटर व मॅकग्रा टॉवर कार्नेल (५३ मीटर) या जगातील आत्तापर्यंतच्या उंच टॉवरपेक्षाही हा टॉवर सुमारे ४० मीटर उंच असेल.

कंपनीचे माजी प्रमुख नारायणमूर्ती या संदर्भात म्हणाले की आमच्या कॅम्पसच्या इमारतींच्या क्लासिक लूकशी जुळेल असाच हा मनोरा असेल. १९ मजली मनोर्‍यात ७ व्या मजल्यावर बोर्ड रूम असेल व त्याच्या बांधणीसाठी ६० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. हा मनोरा २० महिन्यात उभारला जाणार आहे. या क्लॉक टॉवरशिवाय आमचा कॅम्पस अपूर्ण आहे. या टॉवरचे डिझाईन कॅम्पसमधील इमारतींचे डिझाईन केलेल्या हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनीच केले आहे.

टॉवरच्या उभारणीचे काम बंगलोरच्या केइएफ इंन्फ्रा स्टक्चर कंपनीला दिले गेले असून हा टॉवर बंगलोर मध्ये प्रीकास्ट करून नंतर कॅम्पसवर आणून असेंबल केला जाणार आहे. चारी बाजूला मोठा डिजिटल स्क्रीन लावला जाणार आहे व त्याचा उपयोग महत्त्वपूर्ण प्रसंगात टेक्स्ट मेसेज देण्यासाठी केला जाणार असल्याचेही समजते.

Leave a Comment