वेल्‍डरच्या मुलाला मायक्रोसॉफ्टची नोकरी

microsfot
कोटा – हिंदी भाषेत शिक्षण आणि खडगपूरच्या आयआयटीमध्ये बी.टेकचे शिक्षण घेणाऱ्या एका इंजिनिअर विद्यार्थाला मायक्रोसॉफ्टने १.०२ कोटी पगाराच्या नोकरीची ऑफर दिली आहे.

बिहारच्या खगडीया जिल्ह्यातील एका गावचा २१ वर्षीय वात्सल्य सिंह हा रहिवाशी असून त्याचे वडील वेल्डिंगचे काम करून आपल्या कुटुंबाचे भरण-पोषण करतात. आर्थिक परिस्थिती बेताची नसताना देखील त्याच्या वडिलांनी त्याला इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी राजस्थानच्या कोटा या शहरात पाठवले. १२वीत ७५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या वात्सल्यने आयआयटी-जेईई परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर ३८२वा क्रमांक मिळविला होता आणि खडगपूर आयआयटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी. टेकची पदवी देखील घेतली आहे.

मुलाला मिळालेल्या यशाचे कौतुक करताना चंद्रकांत यांनी सांगितले की, आता ते आपल्या कुटुंबाला भरपूर सुख देऊ शकतात. त्याचबरोबर त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेले ३.५० लाखांचे शैक्षणिक कर्ज देखील फेडू शकतो.

Leave a Comment