डेटाविंडचे २ स्वस्त आणि मस्त मिनी लॅपटॉप लॉन्च

data-wind
मुंबई : दोन बजेट अँड्रॉईड ‘मिनी लॅपटॉप’ डेटाविंडने लॉन्च केले असून हे दोन्ही लॅपटॉप ड्रॉयडसर्फर सीरीजचे आहेत. ड्रॉयडसर्फर १० आणि ड्रॉयडसर्फर ७ असे या दोन्ही लॅपटॉपची नावे असून अनुक्रमे ७ हजार ९९९ रुपये आणि ५ हजार ९९९ रुपये अशी किंमत आहे. देशभरातील लॅपटॉप दुकानांमध्ये हे लॅपटॉप उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

यूजर्सना या नोटबुकसोबत रिलायन्स आणि टेलिनॉरचे प्रीपेड कनेक्शन एका वर्षासाठी अनलिमिटेड इंटरनेट ब्राऊजिंग पॅक दिला जाणार आहे. यूजर्सना यासाठी उबीसर्फर ब्राऊजरचा वापर करावा लागणार आहे. यामध्ये ऑडिओ, व्हिडीओ स्ट्रिमिंग आणि लोकल डाऊनलोडिंगचा समावेश नाही. या सेवांसाठी यूजर्स वेगळे टॉप-अप प्लॅन घेऊ शकतात.

लॅपटॉप लॉन्चिंग करताना ‘डेटाविंड इंक’चे सीईओ आणि अध्यक्ष सुनीत सिंह टुली यांनी सांगितले, प्रत्येक क्षणी यूजर्सना मोफत आणि वेगवान इंटरनेट देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. ड्रॉयडसर्फरचे दोन्ही नोटबुक कार्यालयीन काम आणि मनोरंजन यासाठी सर्वोत्तम ठरतील.

कसा आहे डेटाविंडचा ड्रॉयडसर्फर १० : डेटाविंड ड्रॉयडसर्फर १० मध्ये १० इंचाचा १०२४×६०० पिक्सेल रिझॉल्युशनचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे. यामध्ये १.२ गीगाहर्ट्झ ड्युअल कोर कॉर्टेक्स-ए९ प्रोसेसर आहे. १ जीबी रॅम या लॅपटॉपमध्ये देण्यात आला आहे. इनबिल्ट स्टोरेज ८ जीबी, मात्र मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने मेमरी वाढवण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. ०.३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि ६००० एमएमएच क्षमतेची बॅटरी आहे. वायफाय ८०२.११ बी/जी/एन, वायफाय डायरेक्ट, एचडीएमआय पोर्ट आणि मायक्रो यूएसबी कनेक्टिव्हिट असे फीचर्स आहेत.

कसा आहे डेटाविंडचा ड्रॉयडसर्फर ७ : डेटाविंड ड्रॉयडसर्फर ७ मध्ये ७ इंचाचा डब्लूव्हीजीए (८००×४०० पिक्सेल) रिझॉल्युशनचा डिस्प्ले आहे. यामध्ये ड्रॉयडसर्फर १०चाच प्रोसेसर आहे, यात केवळ ५१२ रॅम देण्यात आले आहेत. इनबिल्ट स्टोरेज ४ जीबी असून मायक्रो एसडीच्या सहाय्याने स्टोरेज वाढवलाही जाऊ शकतो. ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment