सोने तस्कर वळले सिगरेट तस्करीकडे

cirette
सोन्याचे उतरते दर, तस्करीतून मिळणारे कमी मार्जिन व तस्करीतील वाढलेला धोका यामुळे आजपर्यंत सोने तस्करीत गुंतलेल्या तस्करांनी त्यांचा मोर्चा आता सिगरेट तस्करीकडे वळविला असल्याचे दिसून येत आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वर्षात आत्तापर्यंत सिगरेटचे अवैध मार्गाने आणण्यात आलेले ५० कंटेनर कस्टम विभागाने पकडले असून त्यांची किमत २०० कोटी रूपये आहे. हे कंटेनर प्रामुख्याने दुबईतून आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार १० सिगरेटचे पाकिट कायदेशीर रित्या आयात करायचे तर त्याची किमत २२० रूपयांवर जाते. तस्कर आयात कर चुकवितात. कांही पैसा मध्ये सोडावा लागला तरीही या व्यवसायात मोठा फायदा होतो. सिगरेटींबरोबरच प.आशियाई देशातील विदेशी चलनही तस्करी करून आणले जाते. आजकाल सोने तस्करी अवघड बनत चालली आहे. कारण सोने प्रत्यक्ष घेऊन येणारी माणसे मिळत नाहीत.शिवाय सोन्याचे दर उतरते राहिले आहेत. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार गेल्या दीड वर्षात फक्त १०० टन सोने अवैध मार्गाने आणले गेले आहे. त्यापूर्वी हेच प्रमाण २०० टन होते.

तस्करी करून आणण्यात येणार्‍या सिगरेटमध्ये प्रामुख्याने टॉप ग्लोबल ब्रँड आहेत. डेव्हीडॉफ, गुडांग गम, मूडस, एसेलाईट, डनहिल, स्विच व माँड हे त्यातही प्रमुख आहेत. युरोमॉनिटर इंटरनॅशनल जागतिक संशोधन संस्थेच्या अहवालानुसार अवैध सिगरेटी आणण्यात भारताचा जगात चौथा नंबर असून भारतात याकाळात २२.८ अब्ज सिगरेट आणल्या गेल्या आहेत. फिक्कीच्या अंदाजानुसार भारतातील एकूण सिगरेट विक्रीच्या २० टकके सिगरेट तस्करीच्या असून त्यामुळे देशाचा ९१३९ कोटी रूपयांचा महसूल बुडला आहे.

Leave a Comment