रॉयल एनफिल्डने लॉन्च केली ४११ सीसी ‘हिमालयन’ !

royal-enfield
नवी दिल्ली : मंगळवारी अधिकृतरित्या आपल्या दमदार आणि शानदार बुलेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या रॉयल एनफील्डची बहुप्रतिक्षित ‘हिमालयन’ ही बुलेट लॉन्च करण्यात आली आहे.

संपूर्णत: भारतात निर्माण करण्यात आलेली ही देशातील पहिली अॅडव्हेन्चर बाईक असून रॉयल एनफील्डने या बाईकसोबत भारतात बाईकच्या एका नव्या सेगमेंटमध्येही प्रवेश केला आहे.

या बाईकमध्ये सिंगल सिलिंडर इंजन ४ स्ट्रोक आहे. यामध्ये ४११ सीस, २ – वॉल्वसोबत लॉन्ग स्ट्रोक आणि एअर कुल्ड आहे. ही बाईक ४,५०० rpm वर ३.३kg ची डिलीव्हरी देते. या बाईकच्या मेन्टेनन्सचा खर्चही इतर बाईकपेक्षा कमी असेल, असे म्हटले जात आहे. १५ लिटरचा पेट्रोल टँक एकदा फुल केल्यानंतर ही बाईक कोणत्याही अडथळ्याविना १०,००० किमी जाऊ शकते. अद्याप या बाईकच्या किंमतीचा खुलासा कंपनीने केलेला नाही. या बाईकचे कमर्शिअल लॉन्च मार्च महिन्यात होणार आहे त्याचवेळी त्याच्या किंमतीचाही खुलासा होईल.

Leave a Comment