भारतात मोटोचा एक्स फोर्स लाँच

moto
मुंबई: भारतात आपला नवीन स्मार्टफोन मोटो एक्स फोर्स मोटोरोला कंपनीने लाँच केला असून मोटोरोलाने या फोनचे एका खास कार्यक्रमात लॉचिंग केले. या स्मार्टफोनमध्ये अनेक नवीन फिचर्स देण्यात आले असून ग्राहकांना हा स्मार्टफोन नक्कीच आकर्षित करेल. पण या फोनची किंमत सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी नाही.

मोटो एक्स फोर्स हा दोन प्रकारात उपलब्ध असून ३२ जीबीचा फोन ४९ हजार ९९९ रूपयांना तर ६४ जीबीचा स्मार्टफोन ५३ हजार ९९९ रूपयांना उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ८ फेब्रुवारीपासून अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा वेबसाईटवरून खरेदी करता येणार आहे.

ह्या स्मार्टफोनमध्ये ५.४ इंचाची क्यूएचडी १४४०×२५६० पिक्सेलचा डिस्प्ले दिला आहे आणि कंपनीचा दावा आहे की, या फोनचा डिस्प्ले शटरप्रुफ आहे. तो तोडला जाऊ शकत नाही. ह्या डिस्प्लेला रिजिड कोरने बनवले आहे. हा फ्लेक्सिबल AMOLED स्क्रीन आणि ड्यूल लेयर टचस्क्रीन पॅनलने बनवली आहे. त्याचबरोबर हास्मार्टफोनवॉटर-रिपेलेंट नॅनो कोटिंगसह येतो. स्मार्टफोनमध्ये क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन ८१० ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे, जो २Ghz ची गती देतो. त्याचबरोबर ह्यात आपल्याला ३जीबीची LP DDR4 रॅम मिळत आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने २टीबी पर्यंत वाढवू शकतो. स्मार्टफोनमध्ये ३७६०mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. आणि कंपनीचा दावा आहे की, स्मार्टफोनमध्ये दिली गेलेली बॅटरी मिक्स वापरल्यावरसुद्धा २ दिवसाचा बॅटरी बॅकअप देते आणि बॅटरी क्विक चार्जला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये २१ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/२.0 अॅपर्चरसह ड्यूल एलईडी फ्लॅशसह मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये फेज डिटेक्ट ऑटोफोकस, त्याशिवाय ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा f/२.0 अॅपर्चरसह लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ५.१.१ लॉलीपॉपवर चालतो. ह्या स्मार्टफोनमध्ये अॅनड्रॉईड ६.० मार्शमॅलो सपोर्ट नाही. हा फोन ४जी एलटीईला सपोर्ट करतो.

Leave a Comment