पृथ्वीच्या उत्पत्तीबाबत शास्त्रज्ञांचा नवा खुलासा

earth
नवी दिल्ली – पृथ्वीची निर्मिती दोन ग्रह एकमेकांवर आदळून झाल्याचे आपल्या सर्वांना माहिती होते. पण आता पृथ्वीच्या उगमाचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञांच्या हाती लागलेल्या पुराव्यांवरून एक नवीन माहिती समोर आली आहे. त्यानुसार मंगळ किंवा पृथ्वीच्याच आकाराएवढा थेइया नावाचा एक ग्रह सुमारे साडे चार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर आदळला आणि त्या दोन्हींची मिळून पृथ्वी तयार झाली असे मत शास्त्रज्ञांनी मांडले आहे. पृथ्वीच्या निर्मितीच्या १० कोटी वर्षांनंतरची ही घटना आहे.

पृथ्वीची निर्मिती थेइया आणि पृथ्वी हे दोन ग्रह एकमेकांवर धडकल्यामुळे झाली होती, हे यापूर्वीच्या संशोधनातच समोर आले आहे. पण आता शास्त्रज्ञांच्या एका नव्या पथकाने केलेल्या संशोधनात नवी माहिती समोर आली आहे. त्यानुसार पूर्वीच्या संशोधनानुसार हे ग्रह केवळ एकमेकांना घासले गेले नव्हते तर समोरासमोर पूर्णपणे एकमेकांवर आदळले गेले होते. ही धडक एवढी जोरदार होती की, पूर्वीची पृथ्वी आणि थेईया या दोन्हीचा मिळून एक स्वतंत्र ग्रह तयार झाला तो ग्रह म्हणजेच सध्याची आपली पृथ्वी. त्याचवेळी या धडकेमध्ये एक वेगळा तुकडा बाजुला उडाला आणि त्याचा एक स्वतंत्र ग्रह तयार झाला. तो ग्रह म्हणजेच चंद्र.

संशोधकांनी अपोलो मिशनच्या वेळी अंतराळविरांनी चंद्रावरून जे खडकाचे अवशेष आणले होते, त्याचा अभ्यास करून हा नवी शोध लावला आहे. हवाई आणि अॅरीझोनामधील ज्वालामुखींच्या खडकांशी याची तुलना करण्यात आली. त्यावेळी शास्त्रज्ञांना या दोन्हींमध्ये आश्चर्यकारक साम्य आढळले. पृथ्वी आणि चंद्रावरील ऑक्सिजन आयसोटेप्समध्ये फारसा फरक सापडला नसल्याचे यूसीएलएचे प्रोफेसर म्हणाले. थेइया हा ग्रह पृथ्वी आणि चंद्र या दोन्हीमध्ये समप्रमाणात सामावलेला आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Comment