केवळ २ मिनिटात विकले ७० हजार लीइको स्मार्टफोन

le-1
मुंबई : केवळ २ मिनिटात ७० हजार ४जी ली १एस हा स्मार्टफोन चीनची इलेक्ट्रॉनिक कंपनी लीइकोने विकले आहेत. या फोनची सुप्रसिद्ध इ-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर विक्री झाली.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ली इकोसिस्टम टेक्नालॉजीचे मुख्य अधिकारी अतुल जैन यांनी सांगितले की ली एस१ ची किंमत १०,९९९ रुपये आहे. पण एक्सिस बँकेच्या कार्डने जर तुम्ही पेमेंट केले तर तुम्हाला तो ९,८९९ रुपयात मिळणार होता. या स्मार्टफोनचे उत्पादन खर्च जवळपास १६,०४२ रूपये आहे, पण कंपनी त्याला सबसिडी किंमतीत विकत असल्याची माहिती जैन यांनी दिली आहे. आज झालेल्या ऑनलाइन सेलला खूप मोठा रिस्पॉन्स आला. आमच्याकडे ७० हजार युनीट विक्रीसाठी होते आणि सर्व स्टॉक केवळ दोन मिनिटात संपला.

सुमारे ६.०५ लाख युजर्सने या फोनसाठी फ्लिपकार्टवर रजिस्ट्रेशन केले होते. कोणत्याही स्मार्टफोनसाठी इतक्या मोठ्याप्रमाणात नोंदणीची ही पहिली वेळ असून यापूर्वीचे नोंदणीचे रेकॉर्ड या फोनने तोडले आहे. ना नफा तत्वावर हा फोन विकण्यात आला होता.

Leave a Comment