आता विमान प्रवासादरम्यानही करा इंटरनेट सर्फिंग

jet-airways
नवी दिल्ली : विमानाने प्रवास करताना जगाशी तुमचा संपर्क विमान लँडिंग होईपर्यंत काही काळासाठी खंडित होतो, असे म्हटल तर काही वावग ठरणार नाही. मात्र आता ४० हजार फुट उंच आकाशात असतानाही तुम्हाला इंटरनेटवर काम करत जगाशी कनेक्टेड राहता येणार आहे.

डोमेस्टिक फ्लाईटमधील प्रवाशांना नव्या जनरेशनची वायरलेस स्ट्रीमिंग सेवा (आयईएफ) जेट एअरवेज ही कंपनी उपलब्ध करुन देणार असल्यामुळे जमिनीपासून हजारो फूट उंचीवर असतानाही तुम्हाला वायफाय वापरुन लॅपटॉप, स्मार्टफोनवरुन इंटरवेट अॅक्सेस करता येणार आहे. काही मोजक्याच आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये सध्या वायफाय सुविधा उपलब्ध आहे. एअर इंडिया, इंडिगो, विस्तारा, एअरएशिया, स्पाईसजेट यासारख्या विमान कंपन्याही प्रवाशांना विमानात वायफाय सुविधा देण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाकडे परवानगी घेण्याच्या तयारीत आहेत.

जेट एअरवेजमध्ये पूर्णपणे ब्रॉडबँड सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी देण्याचा कंपनीचा मानस असून इंटरनेट सर्फिंग, ईमेल, सोशल मीडिया, कनेक्टिंग फ्लाईटची माहिती इत्यादी माहिती उपलब्ध होऊ शकेल. हाय क्वॉलिटी ग्लोबल मनोरंजनामुळे प्रवाशांना प्रवासात सुखसुविधा मिळतील, असा विश्वास कंपनीतर्फे व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment