लवकरच बाजारात दाखल होणार टाटाची ‘जॅग्वॉर एफ टाइप एसव्हीआर’

Jaguar
नवी दिल्ली : लवकरच एक नवीन गाडी बाजारात देशातील अग्रणीच्या कार उत्पादन कंपनी टाटा आणणार असून ही गाडी त्यांच्या मालकीची असलेल्या जॅग्वॉर लँड रोव्हर या कंपनीतर्फे बाजारात उतरवली जाणार आहे. ही गाडी बाजारात ‘जॅग्वॉर एफ टाइप एसव्हीआर’ या नावाने येईल. ही गाडी पहिल्यांदा मार्च मध्ये जेनेव्हा मोटर शोमध्ये पहायला मिळेल.

या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी २०० मैल प्रति तास (३२२ किलोमीटर प्रति तास) इतक्या वेगाने धावू शकेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही गाडी जेनेव्हा मोटर शो मध्ये उतरवल्यानंतर साधारण मे महिन्याच्या आसपास विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा गाडी कंपनीने रोजच्या वापरासाठी बनवली असल्याचे मत कंपनीने व्यक्त केले आहे. या गाडीची बॉडी अॅल्युमिनिअमची असून ती २ सीटर असल्यामुळे ही गाडी जास्तीत जास्त हलकी झाली असून तिचा वेग चांगला झाला आहे. आरामदायीपणा आणि इतर अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच या नव्या फीचर्समुळे गाडीचा लूकही छान आहे. कंपनीने इतक्यात तरी गाडीच्या किंमतीविषयी काही घोषणा केलेली नाही. तसेच इतर बाबींविषयीसुद्धा काही माहिती उघड केलेली नाही.