मराठमोळ्या लावणीचा विश्वविक्रम

lavni
कोल्हापूर – महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी नृत्यप्रकारामध्ये येथील नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांनी रविवारी रात्री विश्वविक्रमाची नोंद केली आहे. गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. सहा वर्षांच्या चिमुरड्यांपासून ते ६० वर्षे वय असलेल्या तब्बल ५७३ जणींनी तपस्या कला सिद्धी अकादमी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

१२ मिनिटे ४६ सेकंद चाललेल्या या नृत्यात १० लावण्या सादर करण्यात आल्या. कोकण, कर्नाटक, मराठवाडा, गोवा, पुणे या विविध भागांतून या सर्व कलाकारांची निवड करण्यात आली होती. गेल्या सहा महिन्यांच्या मेहनतीचे फळ अखेर या सर्व स्त्रियांना रविवारी मिळाले आणि मराठमोठ्या लावणीची विश्वविक्रमी नोंद करण्यात आली. याआधी संयोगिता यांनी गेल्यावर्षी भरतनाट्यम या नृत्यप्रकाराचे सादरीकरण केले होते. त्यात २१०० नृत्य कलाकारांनी सहभाग घेतला होता.

Leave a Comment