पॅसिव्ह स्मोकिंग लठ्ठपणास कारणीभूत

passive-smoking
आपल्या मुलांनी सिगारेट ओढू नये असे कोणाही पालकाला वाटते. मात्र अशी प्रामाणिक इच्छा असणार्‍या पालकांमध्ये काही पालक असे आहेत जे स्वतः मात्र सिगारेट ओढत असतात. आपण सिगारेट ओढलेली चालते. पण मुलांनी ती ओढता कामा नये असे त्यांचे मत असते. कदाचित त्यांची ती तळमळ मुलापर्यंत पोहोचतही असेल आणि आपले आरोग्य आपल्या वडिलांसारखे बिघडू नये म्हणून काही मुले धूम्रपानापासून दूरही राहत असतील. मात्र या मुलांना ते स्वतः सिगारेट ओढत नसले तरी सिगारेटच्या दुष्परिणामांना तोेंड द्यावे लागतेच. कारण ते स्वतः सिगारेट ओढत नसल्यामुळे स्मोकर नसले तरी त्यांचे वडील सिगारेट ओढत असल्यामुळे ते पॅसिव्ह स्मोकर असतात.

ज्या कुटुंबातला प्रमुख सिगारेट ओढतो त्या कुटुंबातील मुले आणि त्याची पत्नी यांनाही सिगारेटचे दुष्परिणाम भोगावे लागतात. लहान मुलांवर होणारा सिगारेटचा असा पहिला दुष्परिणाम म्हणजे त्यांचे वजन वाढते. अशा मुलांच्या मानेवर आणि मानेच्या खाली चरबी साचते आणि ही मुले लठ्ठ होऊन त्यांचे वजन वाढते. ७ ते ११ वयाच्या २२० अती वजनदार मुला-मुलींचे निरीक्षण केले असता असे आढळले की त्यांचे वडील सिगारेट ओढतात म्हणून त्यांचे वजन वाढलेले आहे.

सिगारेटचे अनेक दुष्परिणाम होतच असतात. परंतु ते दुष्परिणाम प्रत्यक्ष सिगारेट ओढणार्‍यावर जेवढे असतात तेवढेच ते त्याच्या सान्निध्यात राहणार्‍या पॅसिव्ह स्मोकरवरसुध्दा होत असतात. एकवेळ प्रत्यक्ष धूम्रपान करणार्‍याला त्याचे वय जास्त असल्यामुळे आणि रोग प्रतिकारक क्षमता तुलनेने जास्त असल्यामुळे कमी परिणाम भोगावे लागतील परंतु त्याच्या सान्निध्यात राहणारी मुले कोवळी असल्यामुळे आणि अधिक संवेदनशील असल्यामुळे त्यांच्यावर होणारे परिणाम हे प्रत्यक्ष सिगारेट ओढणार्‍यापेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे असू शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही