टोयोटोची एफटी वन कन्सेप्ट कार - Majha Paper

टोयोटोची एफटी वन कन्सेप्ट कार

efoti-f
टोयाटोने त्यांची नवीन स्पोर्टस कार बाजारात उतरविण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. एफटी वन असे नामकरण करण्यात आलेली ही कन्सेप्ट कार रेसिंग ट्रॅकवर काय धमाल करणार याची मोठीच उत्सुकता आहे. ही पूर्णपणे परफॉर्मन्स कार असून तिचे डिझाईन अतिशय कुशलतेने केल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेली दोन वर्षे या कारवर काम सुरू आहे. या ट्रॅकफोकस्ड कारचे डिझाईन कॅल्टी डिझाइन रिसर्च संस्थेने केले असून ही संस्था म्हणजे टोयोटोची उत्तर अमेरिकेतील डिझाईन शाखा आहे. ही कार पाहून टोयोटोच्या भविष्यातील कार कशा असतील याचा अंदाज लोकांना येईल असे कंपनीचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या कारचे रियर सेक्शन डिझाईनही अत्यंत आकर्षक बनविले गेले आहे.

Leave a Comment