४० पट वेगवान इंटरनेटसाठी गुगलची ५जी ड्रोन्सची चाचणी

google
न्यूयॉर्क : एका इंग्रजी वृत्तपत्राने सौरऊर्जेवर चालणाऱ्या ड्रोनची चाचणी गुगल घेत असल्याचे वृत्त दिले असून सध्याच्या ४जी इंटरनेटच्या चाळीस पट जलद असा या ड्रोनमुळे ५जी स्पीड मिळवण्यासाठी ही चाचपणी सुरु असल्याची माहिती आहे.

या प्रकल्पाचे कोडनेम स्कायब्लेंडर असे असून त्याच्या ट्रान्समिशनची फ्रिक्वेन्सी २८GHz आणि रेंज कमी असूनही सध्याच्या ४जीच्या तुलनेत ५जी प्रचंड वेगवान असण्याचा दावा केला जात आहे. उंचावरील ड्रोनकडून मिलीमीटर व्हेव तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, हे एक आव्हान असले तरी गुगल यावर मात करण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहे. सध्या हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरण्यास वेळ असून स्कायब्लेंडर हा गुगलच्या हाय स्पीड इंटरनेट मिळवण्यासाठी प्रयोग करणाऱ्या प्रोजेक्ट लून या प्रकल्पाचा एक भाग आहे.

एफसीसी म्हणजेच फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन या रेडियो, टीव्ही, वायर, उपग्रहांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नियंत्रण करणाऱ्या संस्थेकडून गुगलने जुलैपर्यंत चाचणी करण्याची परवानगी घेतली आहे.

Leave a Comment