इंग्लंडमधील दूरसंचार कंपनीचे रेकॉर्ड हॅक

wipro
बंगळूर : इंग्लंडमधील क्लायंट टॉकटॉकच्या ग्राहकांचे रिकॉर्डच्या सुरक्षेला छेद देण्याचा प्रकार उघडकीस आल्याने विप्रोच्या तीन कर्मचा-यांना कोलकाता येथे अटक करण्यात आली आहे. आता हा प्रकार समोर आल्याने विप्रो कंपनीचे मोठे नुकसान होऊ शकते. टॉकटॉक कंपनीच्या प्रवक्त्याने हा प्रकार उघडकीस आल्याने आपली कंपनी विप्रोसोबतच्या संबंधांबाबत नव्याने विचार करीत असल्याचे म्हटले आहे.

विप्रोची टॉकटॉक ही आयटी कंपनी क्लायंट असून, विप्रोच्या कॉल सेंटरचे ही कंपनी काम पाहते. टॉकटॉक फिक्स्ड लाईन ब्रॉडबँड आणि व्हाईस दूरध्वनी सेवा देणारी मोठी कंपनी आहे. या कंपनीची वार्षिक उलाढाल १.७ अब्ज पाऊंड अर्थात १६५४९ कोटी रुपये आहे. ऑक्टोबर महिन्यात टॉकटॉक कंपनी सायबर हल्ल्याचा बळी ठरली होती. त्यावेळी त्यांचे व्यक्तिगत आणि आर्थिक व्यवहार खंगाळले गेले.

या डिटेल्समध्ये १ लाख ५७ हजार ग्राहकांच्या बँक अकाऊंटच्या सूचनेचाही समावेश होतो. दरम्यान, हँडअबिदाली निमचवाला हे विप्रो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून १ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारणार आहेत. यासंदर्भात बोलताना त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी लागेल, असे म्हटले. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते निमचवाला यांनी बीपीओ ऑपरेशन्सवर आंतरिक नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. या मुद्यावरून वरिष्ठ अधिका-यांच्या विरोधातही कारवाई होऊ शकते.

Leave a Comment