पतंजलीची दंतकांती टूथपेस्ट बाजारात

patanjali
मुंबई – जवळपास सर्व बाजारपेठ योगगुरू रामदेव बाबांच्या उत्पादनांनी काबीज केली असून नुकतेच रामदेव बाबा यांनी नूडल्स बाजारात आणून नेस्ले कंपनीपुढे आव्हान उभे केले आहे. आता रामदेव बाबांनी पतंजली दंतकांती टूथपेस्ट बाजारात या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी कोलगेटला टक्कर देण्याचे ठरविले आहे.

बाजार विशेषज्ञांच्या अंदाजानुसार योगगुरू बाबा रामदेव यांच्या टूथपेस्टने बाजाराचा ४.५ टक्के भाग बळकावला आहे. तर दुसरीकडे कोलगेटची ६० अंक म्हणजेच ५७.३ टक्के घसरण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाबा रामदेव यांनी टूथपेस्टच्या बाजारावर आपली पकड मजबूत करण्यासाठी दंतकांतीबरोबरच अन्य उत्पादने आणण्याचा विचार सुरू केला आहे. यामध्ये मेडिकेटेड, एडव्हान्स आणि जूनिअर सामील आहे. बुधवारी ऑक्टोबर-डिसेंबर महिन्याचे सर्वेक्षण अहवाल समोर आले. यामध्ये रामदेव बाबाच्या पतंजली आयुर्वेदीक उत्पादने टूथपेस्ट कंपन्यांना टक्कर देत असल्याचे दिसून आले. जर अशाच प्रकारे बाबा रामदेव यांची उत्पादने बाजारात अशीच डिकून राहिली तर आगामी तीन वर्षात कोलगेटच्या कमाईत १० टक्क्यांपर्यंत घसरण होऊ शकते.

Leave a Comment