‘टोयोटा इनोवा’चे नवे मॉडेल लवकरच भारतात

Tata-Innova
नवी दिल्ली: मागील वर्षी इंडोनेशियामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले ‘टोयोटा इनोवा’चे नवे मॉडेल या वर्षीच्या अखेरीपर्यंत भारतातही उपलब्ध होणार आहे. त्यापूर्वी ‘दिल्ली ऑटो एक्स्पो’मध्ये ही गाडी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

‘इनोवा’चे नवे मॉडेल टोयोटा ‘न्‍यू ग्‍लोबल आर्किटेक्‍चर’च्या प्लॅटफॉर्मआर बनविण्यात आले आहे. या शिवाय या गाडीच्या अंतर्गत रचनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. अॅटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॉवर विंडो, स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, नेविगेशन, ब्लूटूथ कनेक्टिविटी, यूएसबी आणि एयूएक्‍स-इन या सुविधा मिळणार आहेत.

या गाडीमध्ये फ्रंट ग्रिल, स्वेप्टबॅक हेडलँप, एलईडी डे-टाइम रनिंग लँप आणि नवीन फॉग लँप लावण्यात आले आहेत. याशिवाय स्पोर्टी व्हील आर्क आणि नव्या डिझाईनचे टेललँप लावण्यात आले आहेत.

सध्या बाजारपेठेत इनोवाचे केवळ डीझेल इंजिन असलेल्या गाड्या उपलब्ध आहेत. मात्र या नव्या मॉडेलमध्ये २.० लीटरचे व्हीव्हीटीआय पेट्रोल इंजिन आणि २.४ लीटर जीडी डीझेल इंजिन असे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या मॉडेलच्या गाड्यांमध्ये जुन्या मॉडेल्सच्या तुलनेत १० टक्के इंधनाची बचत होईल; असा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment