आयफोनला वायरलेस चार्जिंग सुविधा !

iphone
मुंबई – स्मार्टफोन हा सध्या प्रत्येकाच्याच हातात दिसत आहेत. प्रत्येक मोबाईल कंपनी ग्राहकांना नव-नवे तंत्रज्ञान वापरुन आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र स्मार्टफोन युझर्स नेहमी त्रस्त असतात ते मोबाईलची बॅटरी लो झाल्याने…..

कायम नव-नवे तंत्रज्ञान आपल्या आयफोन किंवा आयपॅडमध्ये अॅपल कंपनी समाविष्ट करत असते. अॅपल कंपनी अद्याप आयफोनला वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान आणले नाही, याबाबत नेहमी आश्चर्य व्यक्त केल जात होते. मात्र, आता आयफोनने आणखीन एक पाऊल उचलले आहे.

ब्लूमबर्ग या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, अॅपल कंपनी नवा वायरलेस चार्जिंग आयफोन बाजारात आणणार आहे. हा आयफोन ७ असेल आणि २०१६ सालापर्यंत हा बाजारपेठेत उपलब्ध होईल. वायरलेस चार्जिंग सुविधेसाठी अॅपलने अमेरिका आणि आशियातील कंपन्यांसोबत कामही सुरु केले आहे, असे ब्लूमबर्गने म्हटले आहे. याआधीही काही स्मार्टफोनना वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आलेली आहे. मात्र, अॅपलच्या गॅजेट्सना ही सुविधा नसल्याने आयफोन युजर्स नाराज असल्याचे दिसून येत होते.

ज्या स्मार्टफोनना वायरलेस चार्जिंगची सुविधा आहे, त्या स्मार्टफोन युजर्सच्याही अनेक तक्रारी आहेत. वायरलेस चार्जिंग डॉकचे स्पीड अतिशय कमी असल्याचे अनेकांचे म्हणणे असल्यामुळे अॅपल कंपनी आपल्या युजर्ससाठी काही खास बदल करणार आहे का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Leave a Comment