आयफोनवर फेसबुक व्हिडिओ स्ट्रीमिंग सुविधा

I-Phone-Facebook
वॉशिंग्टन: आयफोनवर फेसबुक अॅप वापरणाऱ्या ग्राहकांना आता त्यामध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंग सुविधा उपलब्ध झाली आहे. सध्या ही सुविधा केवळ अमेरिकेतील ग्राहकांना उपलब्ध असली तरी लवकरच ती जगभरातील आयफोनवर उपलब्ध होईल; तसेच काही काळाने ती अँड्रॉईड, विंडोज आणि ब्लॅकबेरीच्या स्मार्ट फोनवरही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

आयफोन वापरकर्ते ‘न्यू फीड’च्या ‘अपडेट स्टेटस बॉक्स’मध्ये ‘लाईव्ह व्हिडिओ’ हा पर्याय निवडून व्हिडिओ पाहू शकणार आहेत. या व्हिडीओजन दर्शक आपल्याला हवे असलेले शीर्षक देऊ शकतात; तसेच इतर व्हिडीओजप्रमाणे टाईमलाईनवर शेअरही करता येणार आहेत.

Leave a Comment