ही बाईक देते जगात सगळ्यात जास्त मायलेज

zero-s
मुंबई: भारतात आणि अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त मायलेज देणारी बाईक लवकरच लाँच होत असून या बाईकचे नाव झिरो एस असे असून, ही एक इलेक्ट्रिक बाईक आहे. ही बाईक एकदा चार्ज केल्यानंतर २४० किलोमिटरपर्यंत मायलेज देऊ शकते, तसेच ताशी १४० किलोमिटरच्या वेगाने ही बाईक पळू शकते. ही बाईक चार्ज करायला फक्त २ तास लागतात.

ही बाईक झिरो एस झेडएफ ९.८, झिरो एस झेडएफ १३.० आणि झिरो एस झेडएफ १३.०+ पॉवर टँक या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध होणार आहे. या तिन्ही प्रकारच्या बाईकमध्ये क्लचलेस डायरेक्टर ड्राईव्ह ट्रान्समिशन देण्यात आल्यामुळे शहरातल्या ट्रॅफिक आणि छोट्या गल्ल्यांमधून ही बाईक चालवणे सोयीस्कर होणार आहे. तसेच चांगल्या एअर सस्पेंशनमुळे रस्त्याच्या खड्ड्यांमध्येही ही बाईक चालवताना फारसा त्रास होणार नाही.