हार्ले डेविडसनची स्पोर्ट्सटर १२०० लॉन्च

harle
नवी दिल्ली – महागड्या मोटारसायकल बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हार्ले डेविडसन या कंपनीने भारतीय बाजारपेठेत स्पोर्ट्सटर १२०० कस्टम ही नवी मोटारसायकल लॉन्च केली असून ज्याची दिल्लीत (एक्स शो रूम) किमत ८.९लाख रुपये आहे.

याबाबत हार्ले डेविडसनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, स्पोर्ट्सटर कस्टम मध्ये सीसी एअर-कूल्ड इंजिन असेल आणि ही मोटारसायकल कंपनीच्या बावल प्लांटमध्ये असेम्बल होणार आहे. दरम्यान कंपनीच्या भारतात १३ मॉडेलस विक्रीसाठी उपलब्ध असून त्यातील आठ मोटारसायकलची असेम्ब्लिंग भारतातच करण्याची कंपनीची योजना आहे.