प्राप्तीकर डिजिटल स्वाक्षरीमुळे भरणे सुलभ

tax
नवी दिल्ली – आता आयटीआर (प्राप्तीकर परतावा) भरणे डिजिटल स्वाक्षरीच्या नवीन सॉफ्टवेअरमुळे आणखी सुलभ झाले आहे. एका नवीन सॉफ्टवेअरची सीबीडीटीने निर्मिती केली असून करदात्यांकडून आयटी फायलिंग दरम्यान डिजिटल स्वाक्षरी करण्यामध्ये समस्या आल्यानंतर सीबीडीटीकडून नवीन सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

अनेक करदात्यांना प्राप्तीकर परतावा अपलोड करताना डिजिटल स्वाक्षरी वापरण्याबाबत अनेक अडचणी येत होत्या. त्याबाबत अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्यामुळे या तक्रारींची दखल घेत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने नवीन सॉफ्टवेअरची निर्मिती आहे. ई-फायलिंगसाठी वेबसाईटद्वारा वापरण्यात येणारे जावा ऍपलेट, गुगल क्रोम, मोझीला आणि इंटरनेट एक्सप्लोररच्या नवीन व्हर्जनमध्ये डिजिटल स्वाक्षरी करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आता त्यावर मात करत सीबीडीटीने नवीन सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यामुळे करदात्यांचा वेळ मोठय़ा प्रमाणावर वाचणार आहे.

Leave a Comment