कलेक्टरच्या युक्तीमुळे साफ झाले पिशारकावू तलाव

kerala
कोझीकोड – केरळच्या कोजीकोडचे कलेक्टर एन. प्रशांत यांनी तलावाच्या सफाईसाठी लोकांना बिर्याणी खाऊ घालण्याची ऑफर देऊ केली होती. त्यांच्या या ऑफरने अशी काही जादू केली की, ७५० स्वयंसेवकांनी त्यांच्या या ऑफरला स्वीकारत देशाच्या प्रजासत्ताक दिनी हे तलाव साफ केले आणि या गोष्टीची पूर्ण देशभर चर्चा होऊ लागली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोजीकोडच्या कोयीलंदी परिसरात पिशारकावू नावाचे हे तलाव आहे. हे तलाव तिरुवनंतपुरम पासून २५ किमीवर आहे. कोजीकोडचे कलेक्टर एन. प्रशांत यांनी आपल्या फेसबुक पेजवर या तलावाच्या साफ-सफाईची पोस्ट केली होती. त्याचबरोबर या महाशयांनी याच्या बदल्यात येथील प्रसिद्ध कालिकट बिर्याणी खाऊ घालण्याचा शब्द दिला आणि त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत ७५० स्वयंसेवकांनी तलावाची साफ-सफाई करून टाकली. कलेक्टर एन. प्रशांत यांनी या मोहिमेसाठी दुष्काळ निवारणासाठी आलेल्या निधीचा वापर केला आहे.

Leave a Comment