चहाच्या कंपनीमध्ये रतन टाटांची गुंतवणूक

ratan-tata
नवी दिल्ली – चहा कंपनी टीबॉक्समध्ये प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी गुंतवणूक केली असून सध्या अनेक जागतिक कंपन्यांमध्ये टाटांनी गुंतवणूक केली आहे. टीबॉक्स कंपनीमध्ये किती गुंतवणूक करण्यात आली आहे, याची माहिती सध्या कंपनीकडून देण्यात आलेली नाही.

टीबॉक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी कौशल डगर यांनी आम्ही टाटा यांचे विचार आणि व्यवसाय याचा आदर करतो. त्यामुळेच टाटा उद्योग जागतिक स्तरावर पोहोचला आहे. चहा उद्योगामध्ये त्यांनी गुंतवणूक केल्यामुळे टीबॉक्सला भारतातील पहिला जागतिक चहा ब्रँड होण्यास मदत मिळणार आहे, असे म्हटले आहे. टाटांनी स्नॅपडील, कार्या, अर्बन लॅडर, ब्ल्यूस्टोन, कार देखो, सबसे टेक्नोलॉजीज, जियोमी आणि ओलामध्ये गुंतवणूक केली आहे.

Leave a Comment