शॉपक्लुसवर एक रूपयात करा मनसोक्त शॉपींग

shopclues
मुंबई – आजच्या जगात एक रूपयाची किंमत लाखो, करोडोंच्या भावात किमती तशी फारच कमी आहे. परंतु, आज हा एक रूपयाच ऑनलाईन बाजारात महत्त्वाचा ठरत असून, अनेक गोष्टी केवळ एक रूपयात उपलब्ध आहेत. तुम्हाला हे वाचून कदाचीत आश्चर्य वाटेल. मात्र, हे सत्य आहे. ही किमया ऑनलाईन शॉपींग बेबसाईटने करून दाखवली आहे.

हे धाडस ही वेबसाईट ऑनलाईन बाजारात अग्रक्रमावर असून, http://www.shopclues.com/ ने केले असून या बेबसाईटने ग्राहकांसाठी ‘फ्रि की सेल’ या ऑफरखाली घसघशीत सुट देऊ केली आहे. ही सुट १ पासून ९९ टक्क्यांपर्यंत आहे. या वेबसाईटचा सध्या भलताच बोलबाला असून, जीवनावश्यक अनेक वस्तू केवळ या वेबसाईटवर केवळ एक रूपयाला मिळत असून आतापर्यंत अनेक ग्राहकांनी याचा लाभ घेतला आहे.

या सेल ऑफरमध्ये घरातल्या किचन नॅपकीनपासून मोबाईल कव्हर, बेल्ट, चप्पल, कात्री, मोबाई – लॅपटॉपची युएसबी डेटा केबल, पासून हेडफोन पर्यंत आणि देवी-देवतांच्या मुर्तीपासून महिलांचे ड्रेस, इनर गारमेंट्स, पूरूषांसाठी शेव्हींग क्रिम, लहान मुलांची खेळणी, तसेच घरात लागणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या महत्त्वाच्या गोष्टी पर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. केवळ एक रूपयात वस्तू मिळत असली तरी त्यासाठी शिपींग चार्जेसमात्र ग्राहकाला भरावे लागणार आहेत.

दरम्यान, ऑनलाईन मार्केटचा भाव इंटरनेट आणि मोबाईल फोनचा प्रसार झाल्याने चांगलाच वधारला आहे. लोकांना घरबसल्या सेवा मिळत आहे. ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्याही ग्राहकांच्या या सेवा तत्परतेने पूरवताना दिसत आहेत. तसेच, कंपन्यांनाही ग्राहकांना शोधत बसावे लागत नाही. विकणारा आणि विकत घेणारा अशा दोघांनाही या ऑनलाईन मार्केटमुळे फायदा होत आहे.

Leave a Comment