पदार्थाला मिठाची चव देणारा इलेक्ट्राॅनिक फोर्क

fork
पदार्थ स्वादिष्ट बनविण्यात अनेक मसाले वापरले जातात मात्र मीठ नसेल तर पदार्थ खावासा वाटणारच नाही. मीठ खाण्याचे फायदे जितके आहेत त्यापेक्षा तोटे अधिक आहेत. यामुळेच रक्तदाब, अंगावर सूज येणे, वजन कमी करणे, मूत्रपिंड विकार अशा अनेक व्याधींमध्ये मीठ न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.मात्र आता पदार्थात मीठ न घालताही पदार्थाला मीठाची चव देणे शक्य झाले आहे व त्याचे श्रेय आहे एका जपानी संशोधकांकडे.

टोकियो मेईजी विद्यापीठातील संशोधिका हिरोमी नाकामुरा यांनी एक इलेक्ट्राॅनिक फोर्क म्हणजे काटाचमचा तयार केला आहे. हा चमचा पदार्थात मीठ न घालताही पदार्थ चवदार बनवू शकतो. या फोकर्च दोन भाग आहेत. वरचे हँडल इलेक्ट्रोडचे काम करते. फोर्क तोंडात घालताच सर्कीट संपर्क होतो व तोंडातून काढताच हा संपर्क तुटतो. म्हणजे हा फोर्क स्वीचप्रमाणे काम करतो. संशोधकाच्या मते प्रत्यक्षात इलेक्टॉनिक फोर्क स्वादाची जाणीव करून देणार्‍या इंद्रियांवर परिणाम करतो पदार्थावर नाही. म्हणजे यात मीठाची चव मीठ नसतानाही जाणवू शकते कारण मीठची चव ओळखणार्‍या ग्रंथींवर हा परिणाम होतो.

अर्थात हिरोमी यांनी हा फोर्क इतक्यातच बाजारात आणायचा नाही असा निर्णय घेतला आहे. मीठाप्रमाणेच अन्य चवी ओळखणार्‍या स्वाद इंद्रियांवर संशोधन करून मग सर्व चवींची पूर्तता करू शकणारा फोर्क त्यांना विकसित करायचा आहे.

Leave a Comment