आसूसचा झेनफोन झूम थ्री एक्स आग्रा येथे लाँच

zoom
आसूसने आग्रा येथे त्यांचा नवा झेनफोन झूम स्मार्टफोन लाँच केला असून हा झूम थ्रीएक्स फोन अॅप्टिकल झूमचा जगातील सर्वात सडपातळ स्मार्टफोन असल्याचा दावा केला आहे. या फोनची किंमत ३७९९९ रूपये आहे. तो फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि येत्या कांही दिवसांत हँडसेटबरोबर झेन फ्लॅश व ट्रायपॉडसह तो ३९९९९ रूपयांत उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा फोन फेब्रुवारीपासून आसूसच्या स्टोअर्समध्येही मिळू शकणार आहे.

बाजारात आजच्या घडीला अनेक झूम फोन आहेत मात्र आसूसचा झूमफोन कॅमेर्‍याप्रमाणे न दिसता फोनप्रमाणेच दिसतो. कंपनीचे सीईओ जेरी शेन म्हणाले फोटोग्राफी स्मार्टफोन युजरसाठी महत्त्वाची ठरते आहे व त्यामुळे आजच्या लाईफस्टाईलशी फीट होणारा हा फोन बनविला गेला आहे. त्याला १३ एमपीचा रियर कॅमेरा १० एलिमेंट लेन्सस व इमेज स्टॅबिलायझरसह दिला गेला आहे.हा कॅमेरा ५२ एमपी रिझोल्युशनचे फोटो घेऊ शकतो. त्यात शूटिंग, रेकॉर्डिंग, टेलिफोटो ऑपरेशन्स साठी वेगळी बटणेही दिली गेली आहेत. फोनला ३ जीबी रॅम, १२८ जीबी इंटरनल मेमरी, शिवाय १२८ जीबी मायक्रो एसडी कार्ड अशी फिचर्स आहेत. फोनला अँड्राईड ५.० लॉलिपॉप ओएस आहे व वायफाय डायरेक्ट, ब्ल्यू टूथ, जीपीएस अशी कनेक्टिव्हीटी ऑप्शन्सही आहेत.

Leave a Comment