आता एकमेकांना कनेक्ट होणार व्हॉट्सअॅप आणि फेसबुक

whatsapp
मुंबई – व्हॉट्सअॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच असून आहे. रोजच्या जीवनात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा वापर चॅटींग, आपल्या आठवणी तसेच अनुभव आपल्या मित्र परिवारांपर्यंत शेअर करण्यासाठी केला जातो. याच फेसबुक आणि व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी एक खुशखबर आहे.

ही आनंदाची बातमी म्हणजे फेसबुक आणि व्हॉट्सअॅप एकमेकांना जोडले जाणार आहेत. फेसबुकने दोन वर्षांपुर्वी व्हॉट्सअॅप मॅसेंजरची खरेदी केली होती. मात्र, आजवर त्याची स्वतंत्र ओळख जाणीवपुर्वक जोपासण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप अकाऊंटला फेसबुक अकाऊंटशी जोडण्याचे काम मोठ्या जोराने सुरु आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅपच्या सध्या प्रायोगिक अवस्थेत असणा-या (बीटा व्हर्जन) आवृत्तीमध्ये ‘शेअर माय व्हॉट्सअॅप अकाऊंट विथ फेसबुक’ हा पर्याय उपलब्ध असल्यामुळेच लवकरच फेसबुक आणि व्हॉट्सअॅप हे एकमेकांशी कनेक्ट होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅप अकाऊंट फेसबुकशी कनेक्ट केल्यानंतर व्हॉट्सअॅपवरील स्क्रीनशॉट्स, व्हिडिओ, फोटोज हे फेसबुकवर शेअर करण्यासाठी पर्याय उपलब्ध असेल. अँड्रॉईड डेव्हलपर जेवियर सँटॉसने एक व्हॉट्सअॅप स्क्रीन शॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये या नव्या फीचर्सची एक झलक तुम्हाला पाहायला मिळेल.

समजा व्हॉट्सअॅपवरील एखादा फोटो फेसबुकवर शेअर करायचा असले, तर तो फोटो तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करावा लागतो. त्यानंतर फेसबुक अॅप ओपन करुन पोस्ट करावा लागतो. या मोठ्या प्रक्रियेसाठी वाया जाणारा वेळ व्हॉट्सअॅप फेसबुकच्या इंटिग्रेशनमुळे वाचणार आहे.

Leave a Comment