भारताला चीनमधील आर्थिक मंदीचा धोका

moodys
नवी दिल्ली – सध्या चीनमध्ये आलेल्या मंदीचा आणि अमेरिकन फेडरल बँकने वाढवलेल्या व्याज दराचा भारतीय अर्थव्यवस्था सामना करत असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धोका आहे. भारताने त्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे रेटिंग एजन्सी मूडीजने इशारा देताना म्हटले आहे.

भारताची पुढील १२ ते १८ महिन्यात आर्थिक वाढ ६.५ ते ७.५ टक्के राहण्याची शक्यता आहे. ही वाढ सकारात्मक असून भारतात सध्या उद्योग वाढीसाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत असून त्यामुळे विदेशी गुंतवणूक भारतात वाढत आहे. तसेच अनेक उद्योगांची स्थापना करण्यात येत आहे. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

देशातील मोठय़ा गुंतवणूकदारांसोबत बाजाराशी संबंधित मूडीजने केलेल्या सर्व्हेमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. रेटिंग एजन्सीने आपला हा अहवाल ‘हार्ड फ्रॉम मार्केट : इंडिया नॉट ल्यॅमिन टू एक्सटर्नल रिस्क’ या नावाने सादर केला आहे. मूडीजने याच्या अगोदर मे २०१५ मध्ये सर्वेक्षण अहवाल सादर केला होता.

Leave a Comment