फ्रेंच कंपन्या देणार ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन

france
नवी दिल्ली – फ्रेंच कंपन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला असून नरेंद्र मोदींनी गुंतवणुकीचे आवाहन केल्यानंतर फ्रेंच कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील पाच वर्षात भारतामध्ये १० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. ही गुंतवणूक औद्योगिक क्षेत्रात करण्यात येईल याची माहिती फ्रान्सचे वित्त मंत्री मायकेल सॉपिन यांनी दिली आहे.

मागील पाच वर्षामध्ये फ्रेंच कंपन्यांनी भारतामध्ये प्रत्येक वर्षी १ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. मात्र येणा-या पाच वर्षात आम्ही १० अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यास तयार आहोत, असे सॉपिन यांनी म्हटले आहे. सॉपिन सध्या फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवॉ ओलंद याच्या सोबत भारत दौ-यावर आलेल्या शिष्टमंडळासोबत आले आहेत.

Leave a Comment