पॅनासॉनिकचा एलुगा टर्बो लाँच

panasonic
नवी दिल्ली : आपल्या स्मार्टफोन श्रेणीतील ‘एलुगा टर्बो’ हा ४जीचा नवीन स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक वस्तुंची निर्मिती करणारी आघाडीची कंपनी पॅनासॉनिकने लाँच केला असून १०,९९९ रूपये एवढी या फोनची किंमत आहे.

कसा आहे पॅनासॉनिकचा ‘एलुगा टर्बो’ : यात ५ इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला असून अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटींग सिस्टिम, ३ जीबी रॅम, १.५ गीगाहर्टज् ऑक्टाकोरचा प्रोसेसर त्याचबरोबर एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल रिअर, ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याची इंटरनल स्टोअरेज क्षमता ३२ जीबी आहे. यात ४ जी एलटीई, ३जी, वायफाय, ब्ल्यूटय़ूथ, जीपीएस अशा विविध कनेक्टीव्हीटी देखील देण्यात आल्या आहेत. याच्या बॅटरीची क्षमता २३५० एमएएच एवढी आहे.

Leave a Comment