दोन वर्षांच्या इन्स्टामॉडेलचे ३ लाख फॉलोअर्स

instagram
सिडनी : ऑस्ट्रेलियामधील दोन वर्षांची वॅलेंटिना कॅप्री ही सर्वात तरुण इन्स्टाग्राम ब्लॉगर असून तब्बल ३ लाख यूझर्सनी या चिमुकलीचे इन्स्टाग्रामवरील पोस्ट पाहून तिला फॉलो केले आहे. इन्स्टाग्राम या फोटो ब्लॉगिंग सोशल साईटवर वॅलेंटिनाचे अकाऊण्ट ओपन करण्यात आल्यानंतर हळूहळू तिने दिलेल्या स्पेशल पोझेसचे फोटो यूझर्सना आवडायला लागले. बघता बघता तिचे ३ लाख फॉलोअर्स झाले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचे हे अकाऊण्ट हॅक झाले. त्यानंतर नव्याने उघडलेल्या अकाऊण्टचे २० हजार फॉलोअर्स आहेत. गेल्या वर्षभरात तिच्यासाठी आम्हाला कपडेच खरेदी करावे लागले नाहीत, इतके स्पॉन्सर वॅलेटिंनाला मिळाले, असे तिची आई कौतुकाने सांगते. एकदा एका पोस्टसाठी व्हॅलेंटिनाला ४०० डॉलर म्हणजे सुमारे २४ हजार रुपयांची ऑफर आल्याचीही माहिती आहे. २८ हजार फॉलोअर्सनंतर ती किड्झफॅशन या पॉप्युलर अकाऊण्टची ऑफिशिअल मॉडेल झाली. आम्हाला रोज किमान ७ पॅकेजेसची ऑफर येते अशी माहिती वॅलेंटिनाच्या आईने दिली आहे.

Leave a Comment