मुंबईची कोट्यधीशांमध्ये आघाडी

world-wealth
नवी दिल्ली : सर्वाधिक कोट्याधीश आशिया-प्रशांत भागात मुंबई आणि राजधानी दिल्ली येथे वास्तव्यास असून न्यू वर्ल्डवेल्थद्वारे तयार केलेल्या आशिया-प्रशांत २०१६ च्या अहवालातून ही माहिती समोर आली असून, यामध्ये जपानची राजधानी टोकिओचा प्रथम क्रमांक आहे, तर मुंबई १२ व्या स्थानी आणि दिल्ली २० व्या स्थानी आहे.

टोकिओत कोट्याधीशांची संख्या (एचएनआय) तब्बल २ लाख ६४ हजारांवर आहे. मुंबईत ही संख्या ४१ हजार २०० आणि दिल्लीत २० हजार ६०० आहे. ज्यांची संपत्ती १० लाख डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा लोकांचा एचएनआयमध्ये समावेश आहे. गेल्या १० वर्षांत जकार्ता एचएनआयच्या वृद्धी दरात अव्वलस्थानी आहे. हांगजू आणि तियांजिन या शहरांचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. मुंबई आणि दिल्लीच्या अशा पाच शहरांमध्ये समावेश होतो, ज्या शहरांचा २००० ते २०१५ या काळात अनुक्रमे ३५७ टक्के आणि ३३५ टक्के वृद्धीदर राहिला आहे. २०२५ पर्यंत मुंबई आणि दिल्ली हे दोन भारतीय शहरे कोट्याधीशांच्या दृष्टीने प्रमुख तीन शहरांत सामिल होतील. त्यात जकार्ता पहिल्या क्रमांकावर असेल, असेही या अहवालात म्हटले आहे.

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईतील उलाढाल आणि करोडपतींचे वास्तव्य लक्षात घेता खरोखरच मुंबई आर्थिक केंद्र आहे. त्यामुळे हे शहर भविष्यातही आर्थिक दृष्टीने अधिक सक्षम होऊ शकते. जगात कोट्याधीशांची बरीच शहरे आहेत. त्यात जपानची राजधानी टोकिओ आघाडीवर असले, तरी भविष्यात वेगळेच चित्र पाहायला मिळणार आहे. त्यात राजधानी दिल्लीपेक्षा मुंबई बाजी मारेल, असेही आशिया-प्रशांत २०१६ च्या अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment