‘बीएसएनएल’ देणार विनाअडथळा सेवा

bsnl
पुणे : भारत संचार निगम लिमिटेडचा फोन आहे तसेच मोबाईल सीमकार्ड आहे त्याला नेटवर्क आहे, पण ऐकायला मिळते… इस रूट की सभी लाइनें व्यस्त है… आता त्यातून ग्राहकांची सुटका होऊ शकेल. या कंपनीचे नेटवर्क ओटीएन (ऑप्टिकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क) करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याची सुरुवात मार्च महिन्यापर्यंत होईल अशी माहिती कंपनीच्या पश्चिम दूरसंचार प्रकल्पाचे मुख्य सरव्यवस्थापक एम. के. जैन यांनी दिली. जैन अधिकारी संघाच्या अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलत होते. बीएसएनएलच्या बदलत्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देताना ते म्हणाले, नागपूरहून पुण्यासह प्रमुख पाच दिशांना ऑप्टिकल फायबर नेटवर्क जाईल. असे १२ मार्ग (रूट) असतील.

Leave a Comment